मंत्रिमंडळ विस्तारावरुन आमदारांमध्ये नाराजीचे सूर?, संजय शिरसाट स्पष्टच बोलले
VIDEO | मंत्रिमंडळ विस्तारावरून सरकारमधील आमदारांत नाराजीचा सूर? या नेत्यांच्या प्रश्नावर शिवसेनेच्या आमदारांनं स्पष्टच सांगितलं...
संभाजीनगर : शिंदे फडणवीस सरकारच्या दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्ताराकडे सर्वांच्याच नजरा लागले आहेत दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वी होण्याची शक्यता होती मात्र अद्यापही मंत्रिमंडळ विस्तार हा झालेला नाही त्यामुळे सरकारमधील काही आमदारांमध्ये नाराजीच्या सूर असल्याची चर्चा जोरदार सुरू आहे अशातच प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि माजी मंत्री बच्चू कडू मंत्रिमंडळावर भाष्य करताना म्हणाले होते की, जर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला तर काही जण नाराज होतील. बच्चू कडू यांच्या वक्तव्यावर शिवसेनेचे नेते आमदार संजय शिरसाट यांनी वक्तव्य केले आहे. ते म्हणाले, कोणताही मंत्रिमंडळाचा विस्तार होत असताना काही लोक नाराज होत असतात आणि त्याच्यात विशेष काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला तर पाहिजे प्रत्येकाला वाटते की आपण मंत्री झाले पाहिजे आणि त्यांना का वाटू नये आणि असे थोडे बहुत चालतच राहत असतं. कोणताही मुख्यमंत्री प्रत्येकाला समाधानी करू शकत नाही. त्यामुळे कोणीही नाराज होणं आणि त्या वक्तीची नाराजी स्वाभाविक असल्याची स्पष्ट प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी दिली आहे.