कसबा तो झाकी है, Uddhav Thackeray को डूबाना बाकी है; संजय शिरसाठ यांची राऊतांवर टीका
शिवसेनेचे आमदार संजय शिरसाठ यांनी पुन्हा एकदा संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. सोबत त्यांनी सुप्रिया सुळे यांना देखील सल्ला दिला आहे.
मुंबई : शिवसेनेचे आमदार संजय शिरसाठ यांनी ठाकरे गट आणि संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. औरंगाबादच्या नामांतराला विरोध करणाऱ्या इम्तियाज जलील यांच्यावर देखील त्यांनी टीका केली आहे. जलील ही निजामाची औलाद आहे, ओवैसी जलील हे हैदराबादचे पार्सल आहे. म्हणून ते औरंजेबाचा फोटो दाखवतात हे आम्ही सहन करणार नाही. आम्ही इम्तियाज जलील जाणीव करून देऊ की तुला आता संभाजी नगर म्हणावं लागेल.
‘खेडच्या सभेला मुस्लीम उद्धव ठाकरे धृतराष्ट्राच्या भूमिकेत आहेत, उद्या काश्मीर मधील मुस्लिमांच्या केसाला धक्का लागू देणार नाही असंही उध्दव ठाकरे म्हणतील हे हिंदुत्व आहे का.?’ संजय राऊत धंगेकरांना भेटतात. अरे तुम्ही कोणत्या दिशेने चालला आहेत, कसबा तो झाकी है, उद्धव ठाकरे को डूबाना बाकी है, संजय राऊत उद्धव ठाकरे यांना डुबवत आहेत. शिवगर्जना मेळाव्याला कुठेही गर्दी झालेली नाही, ते डुबत चालले आहेत त्यामुळे हे स्टेटमेंट करत आहेत.
सुप्रिळा सुळे यांना सल्ला
सुप्रिया सुळे या आठवड्यात सातही दिवस मटण खात असतात, पण सुप्रिया सुळे यांनी आपली परंपरा पाळली पाहिजे. असं हे संजय शिरसाठ म्हणाले.