Grampanchayat Election : ‘त्या’ ग्रामपंचायतीचा निकाल लागताच शहाजीबापू पाटील यांचं मोठं विधान, म्हणाले…
राज्यातील ग्रामपंचयात निवडणुकीचे निकाल येण्यास सुरूवात झाली आहे. यावर शिंदे गटाचे नेते आणि आमदार शाहजीबापू पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सांगोला येथील चिकमदूर ग्रामपंचायत शहाजी बापू पाटील यांनी राखल्याबद्दल त्यांनी टीव्ही ९ मराठीशी संवाद साधला.
सांगोला, ६ नोव्हेंबर २०२३ | राज्यातील ग्रामपंचयात निवडणुकीच्या निकालावर शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि आमदार शाहजीबापू पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सांगोला येथील चिकमदूर ग्रामपंचायत शहाजी बापू पाटील यांनी राखल्याबद्दल त्यांनी टीव्ही ९ मराठीशी संवाद साधला. शहाजी बापू म्हणाले, आतापर्यंत सांगोला येथील चिकमदूर या गावात शेतकरी कामगार पक्षाच्या तीन जागा कायमस्वरूपी येत होत्या. मात्र यावेळी तीनही जागा सरपंचासह शिवसेनेने जिंकल्या आहेत. एकूण तालुक्याचा विचार केला तर शिवसेनेला पूरक असे निकाल येत आहे. ४ ग्रामपंचायत असल्याने एका ठिकाणी शेकापचे दोन गट पडले. एक गट शिवसेना धार्जिना आहे. सावे ग्रामपंचायतीची जागा गेली ७० वर्ष शेकापकडे आहे. मात्र तेथे दोन गट पडले तर अनिल देशमुख गटाला माझा पाठिंबा होता, असेही ते म्हणाले.
Published on: Nov 06, 2023 01:17 PM