बेताल वक्तव्यासाठी नारायण राणे यांना केंद्रात मंत्रिपद दिलंय का? शिवसेनेच्या मनीषा कायंदे यांचा सवाल

| Updated on: Sep 09, 2021 | 9:55 AM

बेताल वक्तव्यासाठी नारायण राणे यांना केंद्रात मंत्रिपद दिलंय का?, असा सवाल शिवसेनच्या मनीषा कायंदे यांनी विचारला आहे. यावेळी चिपी विमानतळावरुन देखील त्यांनी टीका केली.

चिपी विमानतळाच्या होऊ घातलेल्या उद्घाटन कार्यक्रमावरून नारायण राणे व त्यांची मुलं बेताल वक्तव्य करत आहे व मुख्यमंत्र्यांना बोलवायची काय गरज आहे प्रोटोकॉल वगैरे अशा गोष्टी ते लोकांना शिकवत आहेत जणू काही त्यांना भारतीय जनता पार्टीने केंद्रीय मंत्री केले आहे ते शिवसेनेवर टीका करण्याच्या एकमेव दृष्टिकोनातून केले आहे की काय असा प्रश्न सामान्यांच्या मनात उद्भवत आहे, अशी टीका शिवसेना आमदार मनीषा कायंदे यांनी केलीय.

Published on: Sep 09, 2021 09:55 AM
कल्याण मार्केटमध्ये तुफान गर्दी, खरेदीसाठी झुंबड
Navi Mumbai MNS | गणपती बाप्पाच्या हातावर टॅटू, मनसे कार्यकर्ते भडकले