असंवैधानिक आणि अनैतिक गोष्टी एकत्र येतात हे दुर्देव – अरविंद सावंत
"असंवैधानिक आणि अनैतिक गोष्टी एकत्र येत आहेत आणि आम्ही प्रत्येक गोष्ट चौकटीत बोलतोय, असा भ्रम निर्माण केला जातोय. हे दुर्देव आहे" अशी टीका शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी केली.
मुंबई: “असंवैधानिक आणि अनैतिक गोष्टी एकत्र येत आहेत आणि आम्ही प्रत्येक गोष्ट चौकटीत बोलतोय, असा भ्रम निर्माण केला जातोय. हे दुर्देव आहे” अशी टीका शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी केली. “महाराष्ट्रात चाललेली लढाई, ती महाराष्ट्रापुरती मर्यादीत नाही, ती देशाच्या संविधानाकडे जाते. सर्वोच्च न्यायालयाने 16 जणांबद्दलची नोटीस आधीच उडवून लावली असती. त्या गोष्टीमुळे घटनात्मक पेच निर्माण झाला. म्हणून पाच न्यायाधीशाच्या खंडपीठाकडे जाण्याचा विचार मांडला, तो सरळ नाहीय” असं शिवसेना खासदार अरविंद सावंत म्हणाले.
Published on: Jul 22, 2022 06:27 PM