गजानन कीर्तिकर म्हणाले… लोकसभा, विधानसभेला ‘तोच’ फॉर्म्युला हवा!
VIDEO | आगामी निवडणुकांमध्ये एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप युती एकत्रित लढणार? काय म्हणाले गजानन कीर्तिकर
मुंबई : आगामी निवडणुकांमध्ये एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप युती एकत्रित लढणार असल्याची चर्चा सुरू असताना मात्र जागावाटपासून दोन्ही पक्षात आतापासूनच खटके उडण्यास सुरुवात झाल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेला शिंदे गटाला 50 जागा देण्यात येतील असं वक्तव्य केल्यानंतर शिंदे गटातील आमदार अस्वस्थ झाल्याचं दिसून येतंय. यानंतर आता गजानन कीर्तिकर यांनीही भाजपला चांगलंच खडसावंलय. 2019 च्या फॉर्म्युल्यानुसारच जागावाटप हवं, असा इशाराही त्यांनी दिला आहे. यावेळी गजानन कीर्तिकर यांनी भाजपला ठणकावून सांगताना ते म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना काय कमजोर नाही, शिवसेना-भाजप यांनी 2019 मध्ये युती करुन लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका लढवल्या होत्या. शिवसेनेसाठी 50 नाही तर विधानसभेला 126 जागा सोडाव्या लागतील. लोकसभेला 22 आणि विधानसभेला 126 जागा आम्हाला मिळाल्याच पाहिजेत, असेही ते म्हणाले.