“पंतप्रधान मोदी महाराष्ट्राचा अपमान करतात तेव्हा राज्यातले भाजपचे नेते गांडुळासारखे शांत बसतात”
पंतप्रधान मोदी महाराष्ट्राचा अपमान करतात आणि महाराष्ट्रातले भाजपचे नेते गांडुळासारखे शांत बसतात, असं म्हणत शिवसेना नेते संजय राऊतांनी (Sanjay Raut) राज्यातील भाजप नेत्यांना सुनावलं आहे. महाराष्ट्र उसळेन, महाराष्ट्र अन्यायाविरूद्ध प्रतिकार करेन, खोट्याच्या विरोधात लढेल, असं संजय राऊत म्हणालेत. संजय राऊत यांनी भाजप आणि केंद्रीय तपास यंत्रणांविरोधात (Central Investigation Agency) आक्रमक भूमिका घेतलीय. राऊत उद्या शिवसेना […]
पंतप्रधान मोदी महाराष्ट्राचा अपमान करतात आणि महाराष्ट्रातले भाजपचे नेते गांडुळासारखे शांत बसतात, असं म्हणत शिवसेना नेते संजय राऊतांनी (Sanjay Raut) राज्यातील भाजप नेत्यांना सुनावलं आहे. महाराष्ट्र उसळेन, महाराष्ट्र अन्यायाविरूद्ध प्रतिकार करेन, खोट्याच्या विरोधात लढेल, असं संजय राऊत म्हणालेत. संजय राऊत यांनी भाजप आणि केंद्रीय तपास यंत्रणांविरोधात (Central Investigation Agency) आक्रमक भूमिका घेतलीय. राऊत उद्या शिवसेना भवन (Shivsena Bhavan) येथे पत्रकार परिषद घेणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी आज शिवसेना भवन परिसरात पाहणी केली. तसंच शिवसेनेच्या सर्व नेत्यांना महत्वाच्या सूचनाही दिल्या. यावेळी माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी शिवसेना म्हणजेच महाराष्ट्र आहे आणि उद्या महाराष्ट्र बोलणार आहे, अशा शब्दात राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.