परप्रांतीय मुद्यावरुन सामना दैनिकातील रोखठोक सदरामधून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर घणाघात केला आहे. उत्तर प्रदेश विधानसभा आणि मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकांसाठी भाजप राजकारण करत आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली. एक दिवस म मराठी माणसालाच महाराष्ट्रात परप्रांतीय ठरवाल, असा जोरदार टोलाही संजय राऊत यांनी भाजपला हाणला. भाजपकडूनच समाजात फूट पाडण्याचं काम सुरु आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली. अशाप्रकारे परप्रांतीय मुद्यावरुन सामना दैनिकातील रोखठोक सदरामधून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर घणाघात केल्याचं दिसत आहे. आता भाजप राऊतांना कशाप्रकारे उत्तर देणार, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे