राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेसोबत दुजाभाव करतेय, Shrirang Barne यांचा आरोप
शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर गंभीर आरोप केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस मुद्दाम शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न करत आहे, असं ते म्हणाले.
शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर गंभीर आरोप केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस मुद्दाम शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न करत आहे. आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेसोबत दुजाभाव करत आहे. निधी वाटपात सुद्धा दुजाभाव केला जातो. मावळ लोकसभेची जागा सोडण्याची मागणी केली की करायला लावली हे शोधलं पाहिजे. या सत्तेचा सर्वाधिक लाभ राष्ट्रवादी घेत आहे. मुख्यमंत्र्यांच्या स्वभावाचा राष्ट्रवादी काँग्रेस गैरफायदा घेत आहे, असं श्रीरंग बारणे म्हणाले.