Vinayak Raut | चिपळूणमध्ये पाणी ओसरायला सुरुवात, खासदार विनायक राऊत यांची प्रतिक्रिया
चिपळूणमध्ये गेले दोन दिवस मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. त्यामुळे संपूर्ण चिपळूणला पुराच्या पाण्याने वेढलेलं आहे. आता पावसाने उसंत घेतलेली आहे. पाणी हळूहळू ओसरायला सुरुवात झालेली आहे.
चिपळूणमध्ये गेले दोन दिवस मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. त्यामुळे संपूर्ण चिपळूणला पुराच्या पाण्याने वेढलेलं आहे. आता पावसाने उसंत घेतलेली आहे. पाणी हळूहळू ओसरायला सुरुवात झालेली आहे. नागरिकांसाठी अन्नपाण्याची व्यवस्था केली जात आहे. अडकलेल्या नागरिकांना सुखरुप बाहेर काढण्याचे काम सुरू आहे मुख्यमंत्र्यांच्या मी संपर्कात आहे. केंद्राकडूनही मदतीची अपेक्षा आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी दिली