फुशारकी मारताना भान ठेवा, विनायक राऊतांची चिपी विमानतळावरून राणेंवर टीका

| Updated on: Sep 08, 2021 | 12:30 PM

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी चिपी विमानतळाची तारीख  जाहीर केली होती. यावेळी त्यांनी शिवसेनेवर टीका केली. यानंतर आता शिवसेनेकडून खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणे यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

सिंधुदुर्गमधील चिपी विमानतळाचा मुद्दा पुन्हा तापला आहे. चिपी विमानतळाच्या उद्घाटनावरुन आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी चिपी विमानतळाची तारीख  जाहीर केली होती. यावेळी त्यांनी शिवसेनेवर टीका केली. यानंतर आता शिवसेनेकडून खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणे यांना प्रत्युत्तर दिलं आहे. नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील चर्चेनुसार चिपी विमानतळाच्या उद्धाटनाची तारीख ठरली आहे. त्यामुळे नारायण राणेंना चिपी विमानतळाचे श्रेय घेण्याचा अधिकार नाही. त्यांनी उगाच फुशारक्या मारू नये, असा पलटवार शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केला आहे.

केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी चिपी विमानतळाची तारीख जाहीर केली होती. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या उद्घाटनासाठी हवेतच असं काही नाही, असंही म्हटलं होतं. त्यावरून विनायक राऊत यांनी राणेंवर पलटवार केला आहे. चिपी विमानतळ व्हावं म्हणून मी चार वेगवेगळ्या बैठका घेतल्या. केंद्रीय मंत्री गजपती राजू, कॅप्टन पुरी त्या आधी सुरेश प्रभू आणि ज्योतिरादित्य शिंदे अशा चार हवाई वाहतू मंत्र्यांसोबत बैठका घेतल्या. गेल्या सहा वर्षापासून एव्हिएशन कमिटीत हा मुद्दा लावून धरला होता. या सर्व प्रयत्नांना अखेर यश आलं. या एअरपोर्टवरून नियमितपणे हवाई वाहतूक करण्याचं निश्चित झालं. कालच उद्धव ठाकरे यांनी ज्योतिरादित्य शिंदेंसोबत सकाळी 11 वाजता चर्चा केली. आणि काल उद्घाटनाचा दिवस ठरला. दोघांनी चर्चा करून दिवस ठरवला, असं राऊत म्हणाले.

…तरच भाजपचा भगवा खरा, बेळगाव महापालिका निवडणुकीवरुन संजय राऊतांंचं नवं आव्हान
संजय राऊत पुण्यात येणारचं, अडवून दाखवा, शिवसेनेचं भाजप नेत्यांना आव्हान