विरोधकांच्या मागं ईडी, सीबीआय लावण्याचे उद्योग बंद करावेत, विनायक राऊतांचा केंद्राला इशारा

| Updated on: Aug 30, 2021 | 12:44 PM

अनिल परब यांना ईडी नोटीस हे केंद्र सरकारनं सुरु केलेल्या षडयंत्राचा भाग आहे. सूडाच्या राजकारणाचा तोटा भाजपलाच भोगायला लागणार आहे. विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या मागे ईडी आणि सीबीआय लावण्याचा उद्योग केंद्रानं बंद करावा, असा इशारा सेना खासदार विनायक राऊत यांनी दिला आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष काही थांबण्याची चिन्ह दिसत नाहीत. नारायण राणेंच्या अटकेत रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांचा महत्वाचा रोल असल्याचं समोर आलं होतं. अनिल परब यांना ईडी नोटीस हे केंद्र सरकारनं सुरु केलेल्या षडयंत्राचा भाग आहे. सूडाच्या राजकारणाचा तोटा भाजपलाच भोगायला लागणार आहे. विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या मागे ईडी आणि सीबीआय लावण्याचा उद्योग केंद्रानं बंद करावा, असा इशारा सेना खासदार विनायक राऊत यांनी दिला आहे. नारायण राणे हऱ्या नाऱ्याच्या भूमिकेत आजही आहेत. त्यांच्या भूमिकेमुळं पदाचं अवमूल्यन होतं आहे. कोरोनाच्या कार्यकाळात उत्तर प्रदेशात जिथं भाजपचं राज्य आहे तिथं साडेतीन ते चार हजार मृतदेह गंगेत टाकण्यात आले होते. महाराष्ट्रात काही सापडलं नाही तर ईडी लावायची, अशी भूमिका केंद्राकडून घेण्यात येत आहे, असा आरोप विनायक राऊत यांनी केला आहे.

“संकटाच्या छाताडावर तांडव करणाऱ्यांना शिवसैनिक म्हणतात” अनिल परबांच्या समर्थनात पोस्टर
नावात राणे, विचार चार आण्याचे, शिवसेना नेते बबनराव थोरात यांचं टीकास्त्र