‘…तरच उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार’, भाजप तयार नाही अन् एकनाथ शिंदे अडून बसले

| Updated on: Nov 30, 2024 | 10:21 AM

दिल्लीतील बैठकीत एकनाथ शिंदे यांनी अमित शाहांसमोर गृहखात्याची मागणी केली आहे. मात्र भाजप गृहखातं सोडण्यास तयार नाही. जर गृहखातं मिळालं नाही तर उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार नाही, अशी भूमिका एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे.

भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या गृहखात्यावरून अडल्याची माहिती आहे. दिल्लीतील बैठकीत एकनाथ शिंदे यांनी अमित शाहांसमोर गृहखात्याची मागणी केली आहे. मात्र भाजप गृहखातं सोडण्यास तयार नाही. जर गृहखातं मिळालं नाही तर उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार नाही, अशी भूमिका एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. दरम्यान, काळजीवाहू मुख्यमंत्री आहे, सर्वांची काळजी घेतोय, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांसोबतच्या बैठकीनंतर दिली. आता देवेंद्र फडणवीस भाजपचे मुख्यमंत्री झाल्यानंतर आता एकनाथ शिंदे कोणत्या भूमिकेत असतील याचे उत्तर अद्याप त्यांनी दिलेले नाही. दिल्लीत अमित शाह यांच्या बैठकीत एकनाथ शिंदेंना दोन ऑफर देण्यात आल्यात. उपमुख्यमंत्री किंवा केंद्रात मंत्री… पण केंद्रात न जाण्याचा निर्णय एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे सरकारमध्ये सहभागी होऊन उपमुख्यमंत्री होणार की पक्षाचीच धुरा सांभाळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर टीव्ही ९ मराठीला मिळालेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे यांना गृहखातं पाहिजे. गृहखातं मिळालं तरच उपमुख्यमंत्री पद घेणार आणि जर गृहमंत्रीपद मिळालं नाहीतर शिंदे पक्षातील दुसऱ्या नेत्याला उपमुख्यमंत्री करणार असल्याची माहिती मिळतेय.

Published on: Nov 30, 2024 10:21 AM
‘काळजीवाहू मुख्यमंत्र्यांचा राजीनामा, हे राज्य कोणाच्या भरवशावर?’, ठाकरे गटाच्या महिला नेत्याचा निशाणा
‘देवेंद्र’ 3.0, बस नाम ही काफी है… दिल्लीत मुख्यमंत्रिपदाबाबत फडणवीसांच्या नावावर मोहोर