निवडणूक प्रक्रियेत आधार कार्ड लिंक करण्यास शिवसेनेचा विरोध – विनायक राऊत
मतदानकार्डला आधारकार्ड लिंक मंजूर करण्याचा प्रस्ताव काल लोकसभेत मंजूर झाला आहे. मात्र मतदानकार्डला आधारकार्ड लिंक करण्यास शिवसेनेने विरोध केला आहे.
मतदानकार्डला आधारकार्ड लिंक मंजूर करण्याचा प्रस्ताव काल लोकसभेत मंजूर झाला आहे. मात्र मतदानकार्डला आधारकार्ड लिंक करण्यास शिवसेनेने विरोध केला आहे. शिवसेना नेते विनायक राऊत यांनी मतदानकार्डला आधारकार्ड लिंक करण्यास आमचा विरोध असल्याचं स्पष्ट केलं आहे. निवडणूक प्रक्रियेत मतदानकार्डाला आधारकार्ड लिंक करायला नको. यामागे केंद्र सरकारचा कुठला तरी कुटील डाव असू शकतो, असा गंभीर आरोप विनायक राऊत यांनी केला आहे. तसेच काल राज्यसभेत जया बच्चन यांनी संताप व्यक्त केला. त्यांचा संताप, उद्रेक स्वाभाविक आहे, असंही त्यांनी सांगितलं.