“संकटाच्या छाताडावर तांडव करणाऱ्यांना शिवसैनिक म्हणतात” अनिल परबांच्या समर्थनात पोस्टर

| Updated on: Aug 30, 2021 | 12:28 PM

अनिल परब यांच्या वांद्रे येथील निवासस्थानी शिवसैनिक जमले होते. अनिल परब यांच्या समर्थनासाठी होर्डिंग लावून  पाठिंबा देण्याासाठी शिवसैनिक जमले आहेत.

शिवसेना नेते परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीनं नोटीस पाठवली आहे. परब यांच्या वांद्रे येथील निवासस्थानी शिवसैनिक जमले होते. अनिल परब यांच्या समर्थनासाठी होर्डिंग लावून  पाठिंबा देण्याासाठी शिवसैनिक जमले आहेत. ज्यांची समोरनं युद्ध करण्याची क्षमता ने नाही ते मागून वार करतात.शिवसैनिक म्हणून आणि युवासैनिक म्हणून सामोर जाऊ, अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली आहे. अनिल परब यांच्या निवासस्थानी पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे. अनिल परब ईडीला सामोरे जाणार का हे पाहावं लागणार आहे. अनिल परब यांना ईडीची नोटीस आल्यानंतर राजकीय वातावरण तापलं आहे.

मंदिर, मशीद, चर्च, गुरुद्वारात जाणारा भाविक आता थांबणार नाही, चंद्रकांत पाटील यांचा इशारा
विरोधकांच्या मागं ईडी, सीबीआय लावण्याचे उद्योग बंद करावेत, विनायक राऊतांचा केंद्राला इशारा