शिवसेनेनं गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांना डिवचलं, कॅन्सर रुग्णांच्या नातेवाईंकांसाठीच्या सदनिकांवरुन टोला
सुखकर्ता को. हाऊसिंग सोसायटीकडून एक होर्डिंग लावण्यात आलं आहे. त्यावर मंत्री जितेंद्र आव्हाड यांना शिवसेनेचा दणका असं ठळक अक्षरात लिहिण्यात आलं आहे. या पोस्टरमुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मुंबई : म्हाडाच्या 100 सदनिका टाटा कॅन्सर रुग्णालयाला देण्याच्या गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या निर्णयाला शिवडीचे स्थानिक आमदार अजय चौधरी यांनी विरोध केला. तशी तक्रार त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी आव्हाडांच्या या निर्णयाला स्थगिती दिल्यामुळे राजकीय वर्तुळात त्याचे पडसाद उमटल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयानंतर करी रोड परिसरातील सुखकर्ता को. हाऊसिंग सोसायटीकडून एक होर्डिंग लावण्यात आलं आहे. त्यावर मंत्री जितेंद्र आव्हाड यांना शिवसेनेचा दणका असं ठळक अक्षरात लिहिण्यात आलं आहे. या पोस्टरमुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Published on: Jun 30, 2021 04:34 PM