शिंदे गटाची ताकत वाढणार, आणखी तीन आमदार गुवहाटीत पोहोचतायत

| Updated on: Jun 23, 2022 | 6:20 PM

मंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यामुळे राज्याच्या राजकारणात अस्थिरता निर्माण झाली आहे.

मुंबई: मंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यामुळे राज्याच्या राजकारणात अस्थिरता निर्माण झाली आहे. महाविकास आघाडी सरकार कोसळण्याच्या स्थिती मध्ये आहे. राज्यात सध्या बैठकांचे सत्र सुरु आहे. एकनाश शिंदेंसह शिवसेनेचे सर्व आमदार आसाम गुवहाटी येथे आहेत. आसाम मध्ये भाजपाची सत्ता आहे. तिथे या सर्व आमदारांना ठेवण्यात आलं आहे. आधी एकनाथ शिंदेंसोबत असलेल्या आमदारांची संख्या 38 होती. आता ही संख्या 41 पर्यंत पोहोचू शकते. दादा भुसे, रवींद्र फाटक आणि संजय राठोड हे तिन्ही आमदार गुवहाटी मध्ये जाणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे शिंदे गटाची ताकत अधिक वाढणार आहे.

Published on: Jun 23, 2022 06:20 PM
Mahavikas  aghadi Government: मविआ सरकारच्या अस्थिरतेमुळे मंत्र्याची धावपळ ; दोन दिवसात निघाले सर्वाधिक जीआर
भाजपाकडे संख्याबळ नाही, नाना पटोलेंचा दावा