Video : राऊतांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीचं समन्स, चौकशीला हजर राहण्याचे आदेश
पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) हे ईडीच्या (ED) कोठडीत आहेत. काल त्यांना कोर्टाने पुन्हा 8 ऑगस्टपर्यंतची कोठडी सुनावली आहे. त्यामुळे राऊत यांचा ईडी कोठडीतील मुक्काम वाढला आहे. राऊत आणि त्यांची पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यात आलेल्या कोट्यवधी रुपयांची तपासणी करायची असून राऊत यांच्याशी संबंधितांची चौकशी करायची असल्याने राऊत यांची कोठडी वाढवून देण्याची मागणी […]
पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) हे ईडीच्या (ED) कोठडीत आहेत. काल त्यांना कोर्टाने पुन्हा 8 ऑगस्टपर्यंतची कोठडी सुनावली आहे. त्यामुळे राऊत यांचा ईडी कोठडीतील मुक्काम वाढला आहे. राऊत आणि त्यांची पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यात आलेल्या कोट्यवधी रुपयांची तपासणी करायची असून राऊत यांच्याशी संबंधितांची चौकशी करायची असल्याने राऊत यांची कोठडी वाढवून देण्याची मागणी ईडीच्या वकिलाने कोर्टात केली होती. ही मागणी मंजूर करण्यात आली आहे. राऊत यांची ईडी कोठडी वाढलेली असतानाच आता त्यांच्या पत्नी वर्षा राऊत (Varsha Raut) यांना ईडीने समन्स बजावले आहे. त्यांना आजच चौकशीला हजर राहण्याचे आदेश ईडीने दिले आहेत. त्यामुळे वर्षा राऊत आज ईडीसमोर हजर राहणार असून ईडीच्या चौकशीला सामोरे जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.
Published on: Aug 05, 2022 09:12 AM