शिंदेंच्या शिवसेनेकडून मुस्लिम महिलांना बुरखा-नकाब वाटप; विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल

| Updated on: Sep 12, 2024 | 11:18 PM

गेल्या लोकसभेत हरल्यानंतर यामिनी जाधव यांच्याकडून मुस्लिम महिलांना बुरखा आणि नकाब वाटप करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. भायखळा परिसरात यामिनी जाधव यांच्याकडून या कार्यक्रमाची जोरदार बॅनरबाजी करण्यात आली होती. करण्यात आलेल्या बॅनरबाजीवरून विरोधकांना टीकेची आयती संधी मिळाल्याने राजकीय वर्तुळात पुन्हा आरोप-प्रत्यारोप सुरू झालेत.

Follow us on

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी आणि विरोधकांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. अशातच मुंबईतील भायखळा विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाच्या यामिनी जाधव यांच्याकडून पक्षाच्या बॅनरखाली मुस्लिम महिलांना नकाब आणि बुरखा वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे विरोधकांनी सत्ताधाऱ्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. तर मुंबईच्या भायखळा विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाच्या यामिनी जाधव यांनी पक्षाच्या बॅनरखाली मुस्लिम महिलांना बुरखा वाटपाचा कार्यक्रम आयोजित केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. शिवसेनेकडून करण्यात आलेल्या या बॅनरला आणि कार्यक्रमाच्या आयोजनाला पाहून विरोधी पक्षाने शिवसेनेवर संधीसाधू राजकारण करत असल्याचा आरोप केला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर यामिनी जाधव यांनी आपला भायखळ्याचा गड राखण्यासाठी पुन्हा एकदा मुस्लिम समुदायाला आपल्याकडे आकर्षिक करण्याचा प्रयत्न सुरु केल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईच्या भायखळा विधानसभेमध्ये पहिल्यांदाच यामिनी जाधव यांनी मुस्लिम महिलांना बुरखा वाटण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात मुस्लिम महिलांनी हजेरी लावावी, असा आशय या बॅनरवर छापण्यात आला होता.