महागाईची तीन बोटं तुमच्याकडे निर्देश करतात, सामनातून भाजपवर टीका

| Updated on: Feb 10, 2022 | 9:33 AM

नरेंद्र मोदी सरकार हल्ली सर्वच गोष्टीचे खापर नेहरू-गांधी आणि आधीची काँग्रेसी सरकारे यांच्यावर फोडत असते. पण सध्याच्या महागाईचे काय? आणि त्यासाठी कोण जबाबदार? हा सामान्य माणसासमोरील आताचा महत्त्वाचा प्रश्न आहे.

सामनाच्या अग्रलेखातून महागाईची तीन बोटे याद्वारे महागाईच्या मुद्यावरुन भाजपला प्रश्न विचारण्यात आले आहेत. नरेंद्र मोदी सरकार हल्ली सर्वच गोष्टीचे खापर नेहरू-गांधी आणि आधीची काँग्रेसी सरकारे यांच्यावर फोडत असते. पण सध्याच्या महागाईचे काय? आणि त्यासाठी कोण जबाबदार? हा सामान्य माणसासमोरील आताचा महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यासाठीही मोदी सरकार नेहरू-गांधी आणि कॉग्रेस सरकारांकडेच बोट दाखविणार आहे का? या एका बोटाचे सोडा, पण इंधन तेलापासून खाद्यतेलापर्यत, भाजीपाल्यापासून मसाल्याच्या पदार्थांपर्यंत सर्वच बाबतीत महागाई रोज जो नवीन उच्चांक गाठत आहे, त्याची तीन बोटे तुमच्याकडेच निदेश करीत आहेत, असं सामनात म्हटलंय.

Special Report | संजय राऊतांचा भाजपावर लेटर बॉम्ब
लता मंगेशकर अध्यासन केंद्राला कुटुंबीयांचा आक्षेप, पत्राद्वारे कुलगुरूंना कळवली नाराजी