Saamna Editorial | शिवसेना भवन फोडण्याची भाषा, प्रसाद लाड यांचा ‘सामना’तून समाचार
भाजप आमदार प्रसाद लाड यांनी शिवसेना भवन फोडण्याची भाषा केली. त्यानंतर शिवसेना त्यांच्यावर तुटून पडली आहे. कार्यकर्ते-नेते-पदाधिकाऱ्यांनी उत्तरं देऊन झाल्यावर खुद्द मुख्यमंत्र्यांनीही थपडीची भाषा केली. आता आज सामनाच्या अग्रलेखातून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आरपार लढाईची भाषा केली आहे.
भाजप आमदार प्रसाद लाड यांनी शिवसेना भवन फोडण्याची भाषा केली. त्यानंतर शिवसेना त्यांच्यावर तुटून पडली आहे. कार्यकर्ते-नेते-पदाधिकाऱ्यांनी उत्तरं देऊन झाल्यावर खुद्द मुख्यमंत्र्यांनीही थपडीची भाषा केली. आता आज सामनाच्या अग्रलेखातून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आरपार लढाईची भाषा केली आहे. शिवसेना भवनापर्यंत तुम्ही स्वतःच्या पायावर याल, पण जाताना कदाचित खांद्यावरच जाण्याची वेळ येईल, असा इशारा देत यायचंय तर या मग, असं बोलावणंच संजय राऊत यांनी लाड आणि राणेंना धाडलं आहे.