नितेश राणेंवर कारवाई करा, ठाकरे गटातील नेता भडकला, ‘त्या’ वक्तव्यावरुन थेट राज्यपाल अन् मुख्यमंत्र्यांना पत्र
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अखिल चित्रे यांनी भाजपचे मंत्री नितेश राणेंविरोधात कारवाईची मागणी केली आहे. यासंदर्भात अखिल चित्रे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपालांना पत्र लिहिले आहे.
भाजपचे मंत्री नितेश राणेंविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अखिल चित्रे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपालांना पत्र लिहिले आहे. अखिल चित्रे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपालांना लिहिलेल्या पत्रातून नितेश राणे यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.’एक मंत्रीपदाची शपथ घेतली आहे आणि ती शपथ संविधानाची घेतलेली आहे आणि त्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे की, कोणाविरुद्ध बदल्याची भावना वगैरे ठेवणार नाही. सगळ्यांना समान वागणूक देणार पण, मला असं वाटतं त्याचं वारंवार उल्लंघन ते करत आहेत. शपथविरोधी वागत आहेत. त्यामुळे राज्यपालांनी त्यांच्यावर कारवाई करावी,’ अशी मागणी अखिल चित्रे यांनी केली. पुढे त्यांनी असेही म्हटले की, राज्यपालांनी कारवाई करण्यासाठी जे या सरकारचे राज्याचे प्रमुख आहेत देवेंद्र फडणवीस त्यांनी मुख्यमंत्री म्हणून की हे शपथविरोधी वागत आहेत, असा प्रस्ताव राज्यपालांनाकडे पाठवणं गरजेचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहासच तोड मरोड करून काहीतरी स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी, काहीतरी समाजात निर्माण करण्यासाठी काहीतरी बोलले तर याला देवेंद्र फडणवीस यांचा पाठिंबा आहे का? त्यांची जी काय भूमिका आहे ती त्यांनी मांडणं गरजेचं असल्याचेही चित्रे यांनी म्हटले.