‘काळजीवाहू मुख्यमंत्री अचानक गायब, प्रत्येक अमावस्या-पौर्णिमेला कोणती शेती?’, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना खोचक टोला

| Updated on: Dec 01, 2024 | 11:41 AM

एकनाथ शिंदे हे दोन दिवस त्यांच्या गावच्या दौऱ्यावर आहेत. त्यामुळे आता आज रविवारी बैठक होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. एकनाथ शिंदे दोन दिवस आपल्या साताऱ्यातील दरे गावाला गेल्याने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने टीका केल्याचे पाहायला मिळत आहे

एकनाथ शिंदे हे सध्या काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून पदभार सांभाळत आहे. अशातच एकनाथ शिंदे शुक्रवारी सायंकाळी अचानक सातारा जिल्ह्यातील त्यांच्या दरे गावी पोहोचले. महाआघाडी सरकार स्थापनेबाबत मुंबईत बैठक होणार होती. मात्र एकनाथ शिंदे हे दोन दिवस त्यांच्या गावच्या दौऱ्यावर आहेत. त्यामुळे आता आज रविवारी बैठक होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. एकनाथ शिंदे दोन दिवस आपल्या साताऱ्यातील दरे गावाला गेल्याने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने टीका केल्याचे पाहायला मिळत आहे. ‘काळजीवाहू मुख्यमंत्री गायब होणं कितपत योग्य आहे?’, असा खोचक सवाल आदित्य ठाकरे यांनी केला आहे. तर प्रत्येक अमवस्या आणि पौर्णिमेला कोणती शेती असते? यानं काही चित्र बदलणार आहे का? असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंना टोला लगावला आहे. एकनाथ शिंदे हे आपल्या गावी गेल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी याबाबत वेगवेगळ्या शंका व्यक्त केल्या आहेत. आदित्य ठाकरे यांना एकनाथ शिंदे यांच्या दरे गावात जाण्याबाबत सवाल करण्यात आला. त्यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आदित्य ठाकरे यांनी आकाशाकडे पाहून ‘तुम्हाला चंद्र दिसतो का?’ असा खोचक सवालही केला. त्यानंतर आता आदित्य ठाकरे यांच्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा होताना दिसतेय.

Published on: Dec 01, 2024 11:41 AM