‘विधानसभेच्या एका टप्प्यातच जनता विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम करणार’, ठाकरेंच्या आमदाराचा हल्लाबोल

| Updated on: Oct 18, 2024 | 5:00 PM

लोकसभेला यांनी शंभर कोटी खर्च केले, विधानसभेलाही करतील, मात्र लोकसभेसारखाच निकाल विधानसभेत ही लागेल, असं ठाकरे गटाचे आमदार राहुल पाटील यांनी विधानसभेत विजयाचा विश्वास व्यक्त केला.

Follow us on

आमची तयारी पाच वर्ष सुरू असते, एक टप्प्यात होत असलेल्या निवडणुकीत एका टप्प्यातच विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम होणार आहे, असा विश्वास ठाकरे गटाचे आमदार राहुल पाटील यांनी व्यक्त केला. पुढे ते असेही म्हणाले की, माझ्या पहिल्या टर्मला 27 हजार मतांनी निवडून आलो, दुसऱ्या टर्मला 82 हजाराने निवडून आलो, यावेळेस 1 लाखांच्या फरकाने निवडून येणार आहे, असा दावाही आमदार राहुल पाटील यांनी केला. यावेळेस राज्यात महाविकास आघाडीसाठी अभूतपूर्व स्थिती आहे. लाडकी बहिण योजना असो की अन्य योजना जाहीर करून काही होणार नाही. सामान्यांना प्रचंड राग या सरकारवर आहे, जनता एकाच टप्प्यात करेक्ट कार्यक्रम यांचा करणार आहे, असे वक्तव्य करत आमदार राहुल पाटील यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. लोकसभा निवडणुकीच्यावेळी त्यांनी आत्मविश्वास दाखवला होता मात्र, यंदा बदल अटळ आहे. परभणीतच नाही तर राज्यातही आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्रित आहोत, यांनी कितीही पैशांचा पाऊस पाडण्याचा प्रयत्न केला. तरी मतदान ही आम्हालाच मिळणार असं वक्तव्य करत त्यांनी निवडणुकीत विजयाचा विश्वास व्यक्त केला.