Mumbai | बंगळुरूतील घटनेचे महाराष्ट्रात पडसाद; मुंबईत भाजप कार्यालयासमोर शिवसेनेचं आंदोलन

| Updated on: Dec 18, 2021 | 8:23 PM

दक्षिण मुंबईत आज संध्याकाळी मोठ्या संख्येनं शिवसैनिक गोळा झाले. त्यावेळी त्यांनी भाजप प्रदेश कार्यालयाबाबत बोम्मई यांच्या निषेधाचे बॅनर झकावले. तसंच भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसंच कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.

मुंबई : कर्नाटकातील (Karnatak) बंगळुरूमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chatrapati Shivaji Maharaj) पुतळ्याची विटंबना झाल्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय. धक्कादायक बाब म्हणजे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavraj Bommai) यांनी विटंबना ही छोटी गोष्ट असल्याचं वक्तव्य केलं आहे. या प्रकारामुळे राज्यात शिवसेना आणि शिवप्रेमी चांगलीच आक्रमक झाली आहे. मुंबईत आज भाजप प्रदेश कार्यालयाबाहेर शिवसेना कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केलं. पांडुरंग सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत घटनेचा निषेध व्यक्त केला.

दक्षिण मुंबईत आज संध्याकाळी मोठ्या संख्येनं शिवसैनिक गोळा झाले. त्यावेळी त्यांनी भाजप प्रदेश कार्यालयाबाबत बोम्मई यांच्या निषेधाचे बॅनर झकावले. तसंच भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसंच कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. ‘बोम्मई म्हणतात की अशा छोट्यामोठ्या गोष्टी होत असतात. म्हणजे शिवाजी महाराज हे छोटी-मोठी गोष्ट आहेत का? मग भाजपचं शिवरायांवरील प्रेम बेगडी आहे का? या गोष्टीचा फक्त महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण हिंदुस्तानात निषेध व्यक्त केला पाहिजे. कर्नाटक सरकार जर माफी मागणार नसेल तर त्यांच्या बसेस महाराष्ट्रात येतात. त्याचा त्यांनी विचार करावा, असा सूचक इशारा पांडुरंग सपकाळ यांनी माध्यमांशी बोलताना दिलाय. दरम्यान, भाजप कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी शिवसैनिकांनी आपल्याला शिविगाळ आणि मारहाण केल्याचा आरोप केला आहे.

Published on: Dec 18, 2021 08:23 PM
Uddhav Thackeray | बंगळुरुतील घटनेचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून निषेध
Pankaja Munde| 26 जानेवारीपासून महाराष्ट्र दौरा करणार; मराठा आरक्षणासाठीही पुढाकार घेणार:पंकजा मुंडे