ईडीवाले सगळे आता तुमच्याकडे! त्यांच्या केसेसचं काय झालं? अरविंद सावंत यांचा सवाल

| Updated on: Sep 17, 2022 | 12:35 PM

Arvind Sawant on BJP : थ्रीजी, टूजीचे आरोप ज्यांच्यावर भाजपने केले, त्यातील आरोपी असलेली लोकं आता केंद्रातील भाजप सरकारमध्ये खासदार आहे, असं म्हणत अरविंद सावंत यांनी भाजपला आरसा दाखवला. एक भ्रम भाजपकडून निर्माण केला जातो, त्या भ्रमाचा आम्हाला फटका बसला, असंही त्यांनी यावेळी बोलताना मान्य केलं.

मुंबई : शिवसेनेचे नेते अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी भाजपवर हल्लाबोल केलाय. राज्यातले प्रकल्प बाहेर जातायत, असं म्हणत त्यांनी शिंदे फडणवीस यांच्या सरकारसह भाजपवर (BJP)  टीका केली. वैचारीक पातळी खाली गेली असून भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्यांकडे काहीच उरलेलं नाही, अशा शब्दांत त्यांनी भाजपवर निशाणा साधला. थ्रीजी, टूजीचे आरोप ज्यांच्यावर भाजपने केले, त्यातील आरोपी असलेली लोकं आता केंद्रातील भाजप सरकारमध्ये खासदार आहेत, असं म्हणत अरविंद सावंत यांनी भाजपला आरसा दाखवला. एक भ्रम भाजपकडून निर्माण केला जातो, त्या भ्रमाचा आम्हालाही फटका बसला, असं त्यांनी यावेळी बोलताना मान्य केलं. चौकशी करायचीच असेल, तर राफेलची (Rafel) चौकशी करा, असंही ते म्हणाले. ज्यांनी आयुष्यात विमानाच्या आणि संरक्षणाच्या क्षेत्रात काही काम केलं नाही, अशांना हजारो एकरची जमीन कशाच्या जीवावर दिली? असा सवाल अरविंद सावंत यांनी उपस्थित केला. स्वतःला वकील म्हणवणाऱ्यांनी आरोप करताना नैतिकतेचा विचार करावा असं म्हणत अरविंद सावंत यांनी अप्रत्यक्षपणे आशिष शेलारांना टोला लगावला. नैतिकतेची पातळी सोडून भ्रष्टाचाराचे आरोप सुरु असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलं. इतकंच काय तर ज्यांच्यावर ईडीने कारवाई केली होती, ती सगळी लोकं आता भाजपाकडेच आहेत. त्यांच्या केसेसचं काय झालं, असा सवालही अरविंद सावंत यांनी यावेळी उपस्थित केलाय.

Published on: Sep 17, 2022 12:35 PM
“सुप्रियाताई, प्रबोधनकार ठाकरेंना के.सी.ठाकरे म्हणण्या एवढ्या तुम्ही मोठ्या झालेला नाहीत”
इम्तियाज जलील मुक्तीसंग्रामदिनी गैरहजर राहतात, नेमका काय संदेश द्यायचाय?- गजानन काळे