घातपात की आत्महत्या? भीमा नदीत आढळले एकाच कुटुंबातील ७ मृतदेह, ३ चिमुकल्यांचाही समावेश
पारगावमधील भीमा नदीच्या पात्रात गेल्या ७ दिवसांत ७ मृतदेह सापडले आहेत. नदीत रोज एक मृतदेह सापडत होता. यामुळे हा हत्येचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे
पुण्यातील दौंड तालुक्यातील पारगाव येथून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. दौंड तालुक्यात भीमा नदीच्या पात्रात एकाच कुटुंबातील ७ जणांचा मृतदेह आढळून आला आहे. या ७ जणांच्या मृतदेहात तीन लहान बालकांचा देखील समावेश असल्याने एकच खळबळ उडाली आहे.
पारगावमधील भीमा नदीच्या पात्रात गेल्या ७ दिवसांत ७ मृतदेह सापडले आहेत. नदीत रोज एक मृतदेह सापडत होता. यामुळे हा हत्येचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नदी पात्रात मिळालेले सर्व मृतदेह हे एकाच कुटुंबातील होते. यामध्ये दोन पुरुष, दोन महिला आणि तीन लहान मुलांचा समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या शवविच्छेदन अहवालानुसार, नदीत सापडलेल्या सातही जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला असल्याचे समोर येत आहे.
Published on: Jan 25, 2023 10:01 AM