महाराष्ट्र दिनी कुठं झालं ‘शोले स्टाईल’ आंदोलन, काय केली मागणी?
VIDEO | छत्रपती संभाजीनगरमधील जिल्हापरिषदेतील उंच टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन, कुणी दिला आत्मदहनाचा इशारा?
संभाजीनगर : स्वतंत्र मराठवाड्याच्या मागणीसाठी छत्रपती संभाजीनगरमधील जिल्हापरिषदेत असलेल्या एका टॉवरवर चढून मराठवाडा मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष बाबा उगले यांनी आंदोलनाला सुरूवात केली आहे. त्यांनी एका उंच जुन्या टॉवरवर चढून शोले स्टाईल केल्याचे पाहायला मिळात आहे. मराठवाडा हे वेगळं राज्य निर्माण व्हावं या मागणीसाठी बाबा उगले यांनी हे अगळं वेगळं आंदोलन पुकारलं आहे. ज्या टॉवरवर चढून आंदोलन करत असणाऱ्या टॉवरखालीच एक बाबा उगले यांचं बॅनर देखील लावण्यात आल्याचे दिसते. यावर मराठवाडा मुक्ती मोर्चा. आत्मदहनाचा इशारा, येत्या १७ सप्टेंबर २०२३ ला बंद पडलेली मराठवाड्यातील मंत्री मंडळाची एक दिवसीय बैठक सुरू करण्याची लेखी हमी १२ वाजेपर्यंत द्यावी, नाहीतर आत्मदहन करण्यात येईल असा आशय लिहिलेला आहे. महाराष्ट्र दिनी जिल्हा परिषदेच्या टॉवरवर चढून मराठवाड्यातील मंत्री मंडळाची एक दिवसीय बैठक सुरू करण्याच्या मागणीसाठी केलेलं हे शोले स्टाईल आंदोलन सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. तर दुसरीकडे जिल्ह्यात या शोले स्टाईल आंदोलनाची जोरदार चर्चा होताना दिसतेय.