श्रेयस तळपदे याला ‘या’ चित्रपटाच्या शुटिंगनंतर हृदयविकाराचा झटका, नेमकं काय घडलं अन् सध्या कशी आहे तब्येत?
‘वेलकम टू द जंगल’ या हिंदी चित्रपटाचं शूटिंग संपवून श्रेयस तळपदे हा घरी आला होता. घरी परतल्यानंतर त्याला श्वास घेण्यास त्रास जाणवू लागल्याने त्याला तातडीने मुंबईतील अंधेरीच्या बेलेव्यू रूग्णालयात दाखल करण्यात आलं. श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर रूग्णालयात उपचार सुरू
मुंबई, १५ डिसेंबर २०२३ : मराठी आणि हिंदी चित्रपटात काम करणारा अभिनेता श्रेयस तळपदे याला गुरूवारी संध्याकाळी हृदयविकाराचा झटका आला. ‘वेलकम टू द जंगल’ या हिंदी चित्रपटाचं शूटिंग संपवून श्रेयस तळपदे हा घरी आला होता. घरी परतल्यानंतर त्याला श्वास घेण्यास त्रास जाणवू लागल्याने त्याला तातडीने मुंबईतील अंधेरीच्या बेलेव्यू रूग्णालयात दाखल करण्यात आलं. श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर रूग्णालयात उपचार सुरू होते. या उपचारादरम्यान रात्री 10 वाजेच्या सुमारास श्रेयस तळपदेवर अँजियोप्लास्टी करण्यात आली. सध्या श्रेयसती प्रकृती ठीक असून त्याला लवकरच रूग्णालयात डिस्चार्ज देण्यात येईल, अशी माहिती आहे. श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती त्याच्या चाहत्यांना किंवा सह कलाकाराला कळताच त्यांना मोठा धक्का बसला. काही चाहत्यांनी त्याच्या प्रकृतीची चिंता व्यक्त करत लवकर बरा हो…अशा शुभेच्छाही दिल्यात.