शिंदे-सावंत आमने-सामने, नारायण राणेही तुटून पडले! लोकसभेत नेमकं काय घडलं?

| Updated on: Aug 09, 2023 | 8:19 AM

VIDEO | लोकसभेत शिंदे गट आणि ठाकरे गट तुटून पडले, नारायण राणे यांनी अरविंद सावंत यांना काय दिला इशारा? बघा स्पेशल रिपोर्ट

मुंबई,९ ऑगस्ट २०२३ | मोदी सरकारविरोधात लोकसभेत अविश्वास ठरावावर चर्चा सुरू झाली आहे. या चर्चेच्या पहिल्याच दिवशी शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे, ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी ते आमने-सामने आलेत. तर केंद्रीय मंत्री नारायण राणे सुद्धा तुटून पडले. लोकसभेत चर्चा मणिपूर हिंसाचार प्रकरणावरून मोदी सरकारविरोधात आलेल्या अविश्वास ठरवाची होती. पण खासदार श्रीकांत शिंदे यांनी लोकसभेतून उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.यावेळी टीका, टिप्पणी, भगोडे, गद्दार इथेपर्यंत पोहोचली. यावेळी अरविंद सावंत यांनी श्रीकांत शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला तर नारायण राणे यांनी अरविंद सावंत यांना थेट औकात दाखवण्याचा इशारा दिला. बघा काय घडलं नेमकं लोकसभेत….

Published on: Aug 09, 2023 08:14 AM
गुड न्यूज! मुंबई- नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडी दूर होणार
फडणवीस यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वात जास्त दिशाभूल केली? कोणी केला थेट आरोप