काहींना सणांची अॅलर्जी, मुंब्र्यातील शाखा पाहणीवरून उद्धव ठाकरे यांच्यावर कुणाचा निशाणा?
काही लोकांना सणांची अॅलर्जी आहे. उद्धव ठाकरे यांना शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदेंनी लगावला आहे. तर सहानुभूती मिळवण्यासाठी उद्धव ठाकरेंचा केविलवाणा प्रयत्न असल्याची टीकाही श्रीकांत शिंदेंनी केली आहे. मुंब्र्यातील शाखा पाहणीवरून ठाकरेंवर श्रीकांत शिंदेंचा हल्लाबोल
मुंबई, १२ नोव्हेंबर २०२३ | काही लोकांना सणांची अॅलर्जी आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी लगावला आहे. तर सहानुभूती मिळवण्यासाठी उद्धव ठाकरे यांचा केविलवाणा प्रयत्न असल्याची टीकाही श्रीकांत शिंदे यांनी केली आहे. मुंब्र्यातील शाखा पाहणीवरून उद्धव ठाकरे यांच्यावर श्रीकांत शिंदे यांनी हा हल्लाबोल केलाय. श्रीकांत शिंदे माध्यमांशी बोलताना म्हणाले, ‘दिवाळी हा सण सर्वांसोबत साजरा करण्याचा सण आहे. तसेच हा सण आनंद देण्याचा सण आहे. पण काही लोकांना सणांची अॅलर्जी आहे. कोणाला हिंदू सण साजरे करण्यापासून आपण कसे रोखू शकतो यावरती काही लोकांचा भर असतो, असंच केविलवाणा प्रकार मुंब्रा येथे काल झाल्याचे पाहायला मिळाला. लोकांना सण साजरा करू न देता सहानुभूती मिळवण्यासाठी उद्धव ठाकरे यांचा केविलवाणा प्रयत्न सुरू होता.’