Vinayak Raut | बेताल विधान करणाऱ्यांना गाडण्याची ताकद सेनेत : विनायक राऊत

Vinayak Raut | बेताल विधान करणाऱ्यांना गाडण्याची ताकद सेनेत : विनायक राऊत

| Updated on: Aug 01, 2021 | 6:41 PM

भुंकणाऱ्या लोकांचे तोंड बंद करायला शिवसेनेला फारसा वेळ लागणार नाही. परंतु भाजपा नेत्यांनी त्यांची तोंडे बंद केली तर भविष्यकाळ आहे, अन्यथा या भांड्यांच्या संगे भाजपा सुद्धा संपून जाईल.

मुंबई : सध्या महाराष्ट्रामध्ये गोपीनाथराव मुंडे, प्रमोदजी महाजन, चंद्रकांत पाटील यांची भाजपा राहिलेली नाही तर प्रसाद लाड, नितेश राणे सारख्या भांडग्यांची भाजपा झालेली आहे म्हणून हे भांडगे लोक आता खूप भुंकायला लागलेले आहेत. या भुंकणाऱ्या लोकांचे तोंड बंद करायला शिवसेनेला फारसा वेळ लागणार नाही. परंतु भाजपा नेत्यांनी त्यांची तोंडे बंद केली तर भविष्यकाळ आहे, अन्यथा या भांड्यांच्या संगे भाजपा सुद्धा संपून जाईल आणि मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टीने माहीमपासून शिवसेना भवन चालण्याचा जो काही कोल्हेकुई करतात त्यांना त्या ठिकाणी गाडण्याची ताकद शिवसेनेमध्ये आहे, मुंबईकरांमध्ये आहे हे त्यांनी लक्षात ठेवावं, असा इशारा शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी भाजपला दिला.

थप्पड-झापडची भाषा मुख्यमंत्र्यांनी करणं दुर्दैवी, प्रविण दरेकरांचं टीकास्त्र
Prasad Lad | वक्तव्याबाबत दिलगिरी, माझ्यासाठी विषय संपला : प्रसाद लाड