Sidharth Shukla | सिद्धार्थ शुक्लावर आज अंत्यसंस्कार, वयाच्या 40व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

| Updated on: Sep 03, 2021 | 2:38 PM

सिद्धार्थ बुधवार संध्याकाळपर्यंत ठीक होता आणि रात्री 3-4 वाजता अभिनेत्याला थोडे अस्वस्थ वाटू लागले. त्याने छातीत दुखत असल्याची तक्रार केली. त्याने थंड पाणी मागितले आणि झोपी गेला. त्यानंतर पुन्हा सकाळी त्याने छातीत दुखण्याची तक्रार केली आणि पाणी मागितले. पाणी पिताना तो अचानक बेशुद्ध झाला. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याला कूपर हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. जेथे दाखल करण्यापूर्वीच त्याला मृत घोषित करण्यात आले.

‘बिग बॉस 13’ फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या (Siddharth Shukla) पार्थिवावर आज (शुक्रवार) अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. काल (गुरुवारी) हृदयविकाराच्या धक्क्याने सिद्धार्थचे निधन झाले होते. सिद्धार्थला मुंबईतील कूपर रुग्णालयात नेण्यात आले होते, जिथे डॉक्टरांनी हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली. सिद्धार्थच्या शवविच्छेदनाचा अहवाल डॉक्टरांनी पोलिसांकडे सुपूर्द केला आहे. मात्र त्यावरुन डॉक्टरांमध्ये मतभेद असून कुठलाच अंतिम निष्कर्ष काढला गेला नसल्याची माहिती आहे.

सिद्धार्थने 2014 मध्ये ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनिया’ चित्रपटातही काम केले होते. या चित्रपटात त्याच्यासोबत वरूण धवन आणि आलिया भट्ट होते. सिद्धार्थ शुक्ला ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनिया’मध्ये सहाय्यक भूमिकेत दिसला होता. या चित्रपटात वरूण धवन आणि आलिया भट्ट मुख्य भूमिकेत दिसले होते. ही बातमी ऐकून वरुण धवन सिद्धार्थ शुक्लाच्या घरी गेला होता. वरुण व्यतिरिक्त राजकुमार राव, असीम रियाज, आरती सिंह, रश्मी देसाई, जयभानुशाली असे सगळे स्टार्स अभिनेत्याच्या घरी पोहोचले होते.

पोलिसांच्या मते, सिद्धार्थ बुधवार संध्याकाळपर्यंत ठीक होता आणि रात्री 3-4 वाजता अभिनेत्याला थोडे अस्वस्थ वाटू लागले. त्याने छातीत दुखत असल्याची तक्रार केली. त्याने थंड पाणी मागितले आणि झोपी गेला. त्यानंतर पुन्हा सकाळी त्याने छातीत दुखण्याची तक्रार केली आणि पाणी मागितले. पाणी पिताना तो अचानक बेशुद्ध झाला. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याला कूपर हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. जेथे दाखल करण्यापूर्वीच त्याला मृत घोषित करण्यात आले.

Solapur | सोलापुरात सलायनमध्ये निघालं झुरळ,रुग्णांच्या आरोग्याबाबत हलगर्जीपणा
50 Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज | 2 PM | 3 September 2021