मोहोळमध्ये 26 वर्षीय सिद्धी कदम यांना तिकीट, सर्वात कमी वयाच्या उमेदवार आहे तरी कोण?

| Updated on: Oct 27, 2024 | 5:46 PM

राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून यंदा ११ महिलांना विधानसभेचं तिकीट देण्यात आलं असून या महिलांमध्ये सर्वात कमी वयाच्या महिला उमेदवाराचाही समावेश आहे. शरद पवार यांच्या पक्षाने सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ मतदारसंघात सिद्धी कदम यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

Follow us on

सोलापूर जिल्ह्यातील मोहोळमधून शरद पवार गटाकडून सिद्धी कदम यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यांच्या विरूद्ध मोहोळ विधानसभेत अजित पवार गटाचे यशवंत माने हे निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून यंदा 11 महिलांना विधानसभेचं तिकीट देण्यात आलं असून त्या 11 महिलांपैकी सिद्धी कदम या एक आहेत. माजी आमदाराच्या लाडक्या लेकीला सिद्धी कदम यांना विधानसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. सिद्धी कदम या माजी आमदार रमेश कदम यांच्या कन्या आहेत. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्समधून सिद्धी कदम यांनी शिक्षण पूर्ण केले आहे. सध्या सिद्धी कदम या एका एनजीओमध्ये काम करतात. 2019 च्या विधानसभेदरम्यान रमेश कदम जेलमध्ये असताना कन्या सिद्धी कदम यांनी प्रचाराची धुरा सांभाळली होती. सिद्धी कदम या 26 वर्षांच्या तरूण उमेदवार आहे. आतापर्यंत जाहीर झालेल्या सोलापूर जिल्ह्यातील उमेदवारांपैकी त्या सर्वात तरूण उमेदवार आहेत.