युक्रेनची राजधानी कीवमध्ये पुन्हा हवाई हल्ल्याचे संकेत
रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या आठ दिवसांपासून युद्ध सुरू आहे. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यात आतापर्यंत युक्रेनचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. आता पुन्हा एकदा रशिया कीववर हवाई हल्ला करण्याच्या तयारीत आहे.
रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या आठ दिवसांपासून युद्ध सुरू आहे. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यात आतापर्यंत युक्रेनचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक युक्रेनियन नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. मोठ्याप्रमाणात वित्तहानी देखील झाली आहे. युद्ध मागे घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरून रशियावर दबाव निर्माण केला जात आहे. मात्र या दबावाला न जुमानता रशियाचे युक्रेनवर हल्ले सुरूच आहेत. रशिया पुन्हा एकदा युक्रेनची राजधानी कीववर हवाई हल्ला करण्याच्या तयारीत आहेत. या पार्श्वभूमीवर युक्रेनकडून पूर्ण खबरदारी घेण्यात येत असून, नागरिकांना बंकरबाहेर न येण्याच्या सूचना देण्यात आल्या आहोत.