अब्दुल सत्तारांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी होणार? भाजपचा आक्रमक पवित्रा, नेमकं प्रकरण काय?

| Updated on: Jun 14, 2024 | 1:44 PM

पक्ष विरोधी काम आणि युती धर्म पाळला नसल्यामुळे मंत्रिमंडळातून अब्दुल सत्तार यांची हक्कलपट्टी करा, अशी थेट मागणी सिल्लोड शहर अध्यक्षांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली. कमलेश कटारिया असं भाजपच्या सिल्लोड शहराध्यक्षांच नाव असून अशी त्यांची मागणी आहे.

शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक विकास व पणन मंत्री अब्दुल सत्तार यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अशी मागणी भाजपकडून करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. भारतीय जनता पार्टीच्या सिल्लोड शहर अध्यक्षांनी ही आक्रमक मागणी केली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना भाजपच्या सिल्लोड शहर अध्यक्षांनी पत्र लिहून ही मागणी केली आहे. पक्ष विरोधी काम आणि युती धर्म पाळला नसल्यामुळे मंत्रिमंडळातून अब्दुल सत्तार यांची हक्कलपट्टी करा, अशी थेट मागणी सिल्लोड शहर अध्यक्षांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली. कमलेश कटारिया असं भाजपच्या सिल्लोड शहराध्यक्षांच नाव असून अशी त्यांची मागणी आहे. दरम्यान, अब्दुल सत्तार यांच्या विरोधात सिल्लोड भारतीय जनता पार्टी सध्या आक्रमक असल्याचेही पाहायला मिळत आहे. भाजपचे मंत्री रावसाहेब दानवे यांच्या विरोधात काम केल्यामुळे भाजप ऍक्शन मोडवर असल्याची चर्चा सध्या रंगताना दिसत आहे.

Published on: Jun 14, 2024 01:44 PM
Mumbai Rain Forecast : मुंबईत पहाटेपासून हलक्या सरी, येत्या 24 तासांत कसा असेल पावसाचा जोर? IMD चा अंदाज काय?
मनोज जरांगे पाटील यांनी जरा दमानं घ्यावं, गुलाबराव पाटील नेमकं काय म्हणाले?