वाराणसीच्या धर्तीवर नाशिकमध्ये होणार गोदा आरती, सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर कुणाचा निर्णय?
VIDEO | सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिककरांना अनोखी अनुभूती, वाराणसीच्या धर्तीवर रोज संध्याकाळी होणार गोदावरीची आरती
नाशिक : वाराणसीच्या गंगा घाटावर रोज गंगेची नेत्रदिपक आरती केली जाते. त्याच धर्तीवर नाशिकच्या रामकुंडावर गोदावरीची आरती करण्यात येणार आहे. दररोज संध्याकाळी नाशिकमध्ये गोदा आरती केली जाणार असल्याची माहिती मिळतेय. त्यामुळे आता सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिककरांना अनोखी अनुभूती मिळणार आहे. नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पर्यटन विभागाकडून हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. तर याकरता पर्यटन विभागाकडून गोदा आरतीसाठी ५ कोटी रूपये मंजूर करण्यात आले आहेत. सध्या वाराणसी येथे नाशिक महापालिकेच्या अधिकाऱ्यांचा अभ्यास दौरा गेला असून नाशिकच्या रामकुंडावर कशाप्रकारे गोदा आरती केली जाऊ शकते, याचा अभ्यास करण्यासाठी दाखल झाली आहे. तर महापालिका प्रशासनाकडून सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदा आरतीचं नियोजन आणि कामकाज सुरळीत व्हावं, यासाठी एक समिती देखील नेमण्यात आली आहे. त्यामुळे आता नाशिककरांना लवकरच वेगळा अनुभव घेता येणार आहे.