MNS Raj Thackeray : मनसेचं ‘रेल्वे इंजिन’ राज ठाकरेंच्या हातून जाणार?, एकही उमेदवार विजयी नाही, मोठा फटका बसणार?

| Updated on: Nov 24, 2024 | 8:14 PM

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मनसेला केवळ 1.8 टक्के मते मिळाली आहेत. त्यामुळे मनसेची मान्यता रद्द होऊ शकते का? यावर सखोल माहिती माजी विधानसभा सचिव अनंत कळसे यांनी दिली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या निकालात स्पष्ट बहुमत हे महायुतीला मिळालं आहे. यानंतर आता नवीन विधानसभा अस्तित्वात येणार आहे. यासंदर्भात पुढील प्रक्रिया नेमकी कशी असणार यावर सखोल माहिती माजी विधानसभा सचिव अनंत कळसे यांनी दिली आहे. ‘१४ वी विधानसभा येत्या २६ नोव्हेंबर रोजी संपुष्टात येणार आहे. त्यामुळे नवीन सरकार लवकरात लवकर स्थापन होणं गरजेचं आहे. मुख्यमंत्री पदाचा शपथविधी झाला म्हणजे सरकार स्थापन झाल्या सारखेच मानले जाते. यावरून नवीन विधानसभेची प्रक्रिया जलद गतीने करावी लागणार आहे.’, अशी माहिती त्यांनी दिली आहे. यासोबतच मनसेचा एकही उमेदवार निवडून न आल्यामुळे पक्षाची मान्यता रद्द होऊ शकते, अशी चर्चा होत असताना अनंत कळसे यांनी पक्षाला मान्यता कायम राहावी, म्हणून काय अटी आहेत, याचीही माहिती दिली आहे. निवडणूक आयोगाचा पक्ष मान्यतेसाठी निवडणूक आयोगाचे निकष असतात. 1 आमदार किंवा एकूण मतदानांच्या 8 टक्के मतं मिळाली तर त्यांची मान्यता राहते. 2 आमदार किंवा एकूण मतदानाच्या 6 टक्के मतं, 3 आमदार किंवा एकूण मतदानाच्या 3 टक्के मतं मिळायला हवीत. या अटी पूर्ण असल्यास पक्षाची मान्यता कायम राहते असे त्यांनी सांगितले.

Published on: Nov 24, 2024 08:11 PM
अजित पवारांचा शरद पवार गटाच्या विजयी उमेदवाराला थेट फोन अन्… दादा नेमकं काय म्हणाले?
‘भाजपनं शब्द मोडला, त्यांच्या पाठिंब्यावर संशय; आता कार्यालयात त्यांनी मौलानाचा फोटो…’, मनसे नेत्याचा घणाघात