Sindhudurg Bank Election | जिल्हा बँकेचे निकाल जाहीर, मविआला मोठा धक्का, उमेदवार सतीश सावंत पराभूत
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 19 जागांसाठी मतमोजणी सुरू झाली आहे. या निवडणुकीचे निकाल लागण्यास सुरूवात झाली आहे.
संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे निकाल लागायला सुरुवात झाली आहे. संतोष परब हल्ला प्रकरणातील संशयित आणि भाजपचे उमेदवार मनिष दळवी या निवडणुकीत विजयी झाले आहेत. या निवडणुकीत भाजपचा आतापर्यंत 8 आणि महाविकास आघाडीच्या 5 उमेदवारांचा विजय झाला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 19 जागांसाठी मतमोजणी सुरू झाली आहे. या निवडणुकीचे निकाल लागण्यास सुरूवात झाली आहे. संतोष परब हल्ला प्रकरणात संशयित आरोपी असलेले भाजपचे उमेदवार मनिष दळवी विजयी झाले आहेत. त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार विलास गावडेंचा पराभव केला आहे.