भाजपच्या स्क्रिप्टनुसार एकनाथ शिंदे बोलतात, मुख्यमंत्र्यांवर उबाठा नेत्याचा घणाघात
शिंदे गटाचे नेते आणि शिंदे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली 8 वर्षे सत्तेत होते. त्यावेळी कधी त्यांनी यावर प्रश्नचिन्ह उभं केलं नाही? असा सवाल वैभव नाईक यांनी केला. तर आज एकनाथ शिंदे जे बोलत आहेत ते भाजपच्या भूमिकेनुसार बोलताय.
सिंधुदुर्ग, १ डिसेंबर २०२३ : पक्षप्रमुख पदी उद्धव ठाकरे यांची निवड ही अवैध्य असल्याची टीका आणि युक्तीवाद सध्या सुरू आहे. हा युक्तीवाद शिंदे गटाकडून करण्यात येत आहे. तर घटनेत अशी तरतूद नसल्याचेही शिंदे गटाकडून म्हटलं जात आहे. यावर ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले, हेच शिंदे गटाचे नेते आणि शिंदे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली 8 वर्षे सत्तेत होते. त्यावेळी कधी त्यांनी यावर प्रश्नचिन्ह उभं केलं नाही? असा सवाल वैभव नाईक यांनी केला. तर आज एकनाथ शिंदे जे बोलत आहेत ते भाजपच्या भूमिकेनुसार बोलताय. इतकेच नाही तर एकनाथ शिंदे हे भाजपच्या आदेशानुसार भाजपच्या स्क्रिप्टनुसार बोलत आहेत, असा आरोपही वैभव नाईक यांनी केलाय. यासह त्यांनी युतीवरही भाष्य केले आहे. भाजप आणि शिवसेनेची पूर्वीपासून युती होती. सत्ता दिसताच भाजपने शिवसेना डोमिनेट करण्याचा प्रयत्न केला. निवडणुकीतील यश पाहून भाजपने आमच्या बरोबर युती तोडली. प्रफुल्ल पटेल यांनी सांगितल्याप्रमाणे शिवसेना ही नेहमीच भाजप बरोबर ठाम उभी राहिली हे आता सिद्ध झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.