सिंधुदुर्गमध्ये धोधो धारा.. 121 मिमी पावसाची नोंद
अरबी समुद्रातून बाष्पयुक्त वारे वाहत असल्याचा परिणाम म्हणून राज्यात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाने गेल्या तीन ते चार दिवसांपासून चांगलाच जोर धरला आहे. गुरुवारीही मुंबई, ठाण्यासह कोकण विभागात सर्वच ठिकाणी आणि पश्चिम महाराष्ट्रातही बहुतांश भागात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या.
अरबी समुद्रातून बाष्पयुक्त वारे वाहत असल्याचा परिणाम म्हणून राज्यात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाने गेल्या तीन ते चार दिवसांपासून चांगलाच जोर धरला आहे. गुरुवारीही मुंबई, ठाण्यासह कोकण विभागात सर्वच ठिकाणी आणि पश्चिम महाराष्ट्रातही बहुतांश भागात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला गेल्या तीन दिवसांपासून पावसाने झोडपून काढलं आहे. या भागात सर्वच नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याचे प्रकार होत आहेत. काही भागात पावसामुळे जनजीवन विस्कळीत होत असतानाच पेरण्या आणि पिकांसाठी मात्र पाऊस उपयुक्त ठरत आहे. त्याचप्रमाणे चिंताजनक अवस्थेत पोहोचलेले धरणांतील पाणीसाठे सुधारत असल्याचंही दिसून येत आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आदी जिल्ह्यांत दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा आहे.
Published on: Jul 08, 2022 01:23 PM