Sindhutai Sapkal Funeral | सिंधु नावाचं वादळ अनंतात विलीन, पुण्यातील ठोसरपागेत अंत्यसंस्कार
पाण्यानं डबडबलेलं डोळे, जोडलेले हात अन पार्थिवाच्या पुढं नतमस्तक होत, हजारोंच्या उपस्थितीत जेष्ठ सामाजिक सेविका सिंधूताई संकपाळ यांना शासकीय इतमामात मानवंदना देत अखेरचा निरोप देण्यात आला. पद्मश्री पुरस्काराने सन्मानित सिंधूताई सकपाळ यांच्यावर नवी पेठेतील ठोसरपागा येथील स्मशानभूमीत महानुभव पंथाच्या प्रथेप्रमाणे अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.
पाण्यानं डबडबलेलं डोळे, जोडलेले हात अन पार्थिवाच्या पुढं नतमस्तक होत, हजारोंच्या उपस्थितीत जेष्ठ सामाजिक सेविका सिंधूताई संकपाळ यांना शासकीय इतमामात मानवंदना देत अखेरचा निरोप देण्यात आला. पद्मश्री पुरस्काराने सन्मानित सिंधूताई सकपाळ यांच्यावर नवी पेठेतील ठोसरपागा येथील स्मशानभूमीत महानुभव पंथाच्या प्रथेप्रमाणे अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. यावेळी शहरातील महापौर मुरलीधर मोहळ , काँग्रेसचे नेते विश्वजित कदम यांच्यासह अनेक नेते, सामाजिक कार्यकर्ते व नागरिकानी सिंधूताई सकपाळ यांनी श्रद्धांजली अर्पण केली.
माईंच्या निधनानंतर मांजरी येथील सन्मती बाल निकेतन या आश्रमात दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. माईंच्या निधनाची माहिती मिळात , आश्रमासमोर मोठ्या प्रमाणात अंत्यदर्शनासाठी गर्दी निर्माण झाली होते. सिंधुताईंच्या जाण्याने समाजिका जीवनात मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना सर्वच स्तरातून व्यक्त केलं जात आहे.