सिंहगड एक्स्प्रेसच्या प्रवासी अन् पास धारकांमधील वाद आता मिटणार, प्रशासनाकडून मोठा निर्णय
VIDEO | पुणे मुंबई पुणे अशा मार्गावर धावणाऱ्या सिंहगड एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी, बघा प्रशासनाने कोणता घेतला निर्णय?
पुणे : पुणे मुंबई पुणे अशा मार्गावर धावणाऱ्या सिंहगड एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. पुणे मुंबई पुणे अशा मार्गावर धावणाऱ्या सिंहगड एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांमध्ये जागेवरून वादावादी झाली होती. वादावादी होण्याची ही घटना पहिलीच नसून बऱ्याचदा सिंहगड एक्स्प्रेसमध्ये होणारे वाद कित्येकदा समोर आले आहे. पुणे मुंबई सिंहगड एक्स्प्रेसमध्ये खडकी ते लोणावळा दरम्यान जागेसाठी प्रवासांमध्ये वाद झाला होता. महिलांना बसायला जागा मिळत नसल्याने काही जणींनी एका व्यक्तीशी वाद घातल्याचा एक व्हिडिओ समोर आला होता. यानंतर पुणे मुंबई पुणे सिंहगड एक्स्प्रेसचे पूर्वीप्रमाणे डबे वाढवण्यात यावे अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात आली होती. यानंतर या ट्रेनची बोगी संख्या १९ होती ती १४ केल्यानं मासिक पास धारक प्रवाशांना प्रवास करतांना अडचणी येत असल्याचे सांगितले जात होते. मात्र आता १ मेपासून १६ डब्यांसह सिंहगड एक्स्प्रेस धावणार आहे. सिंहगड एक्स्प्रेसला अतिरिक्त डबा जोडण्यात येणार असल्याने प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पासधारक आणि इतर प्रवसांमधील वाद टाळण्यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.