Mumbai Sion Bridge : मुंबईकरांसाठी मोठी बातमी, ब्रिटिशकालीन पूल वाहतुकीसाठी बंद, थेट ‘या’ वर्षी होणार खुला
मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेत अत्यंत महत्त्वाचा असणारा शंभरहून अधिक वर्षांचा सायनचा पूल १ ऑगस्टपासून सगळ्या प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. तर दोन वर्षांनी म्हणजे २०२६ मध्ये हा सायनचा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. तत्पूर्वी मुंबईत वाहतूक कोंडी अधिक बिकट होण्याची शक्यता आहे.
मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. सायनचा पूल १ ऑगस्टपासून सगळ्या प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. तर दोन वर्षांनी म्हणजे २०२६ मध्ये हा सायनचा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. तत्पूर्वी मुंबईत वाहतूक कोंडी अधिक बिकट होण्याची शक्यता आहे. तर या ब्रीजवर प्रशासनाकडून एक बॅनर लावण्यात आला आहे. यामध्ये सायन रेल्वे ओव्हर ब्रिज हा अवजड वाहनांना वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे, अशी सूचना यामध्ये नागरिकांना देण्यात आली आहे. मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेत अत्यंत महत्त्वाचा असणारा शंभरहून अधिक वर्षांचा सायन पूल हा वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याने आता याला कोणता पर्यायी मार्ग असणार यावर मुंबईकरांची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, १ ऑगस्ट २०२४ ते ३१ जुलै २०२६ पर्यंत २ वर्षे सायन पूर्व-पश्चिम परिसराला जोडणारा सायन ओव्हर ब्रिज हा मध्य रेल्वे प्राधिकरणाकडून तोडून नवीन बांधण्यात येणार असल्याची माहिती मिळतेय.