Special Report | अनिल देशमुख पोलिसांच्या बदल्यांसाठी अनधिकृत यादी पाठवायचे, सिताराम कुंटेचा ईडीकडे जबाब, सूत्रांची माहिती
राज्याचे माजी मुख्य सचिव सिताराम कुंटे (Sitaram Kunte) यांनी ईडीला (ED) दिलेल्या जबाबात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत.
मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या अडचणी वाढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्याचे माजी मुख्य सचिव सिताराम कुंटे (Sitaram Kunte) यांनी ईडीला (ED) दिलेल्या जबाबात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. सिताराम कुंटे यांचा जबाब 7 डिसेंबरला ईडीनं नोंदवला होता. अनिल देशमुख यांच्या कडून अनधिकृत याद्या पाठवायचे, असं सिताराम कुंटे यांनी ईडीला दिलेल्या जबाबात म्हटल्याची माहिती कळतेय. सिताराम कुंटे यांनी ईडीला दिलेल्या जबाबामुळं अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढू शकतात. पोलीस बदल्यांसाठी अनिल देशमुख अनधिकृत याद्या पाठवायचे, असं सिताराम कुंटे यांनी ईडीला दिलेल्या जबाब म्हटलं होत, अशी माहिती सूत्रांकडून येत आहे. अनिल देशमुख त्यांच्या माणासांकडून विशेषत: संजीव पलांडे त्यांच्या इतर व्यक्तीकडून यादी पाठवायचे, असं कुंटे यांनी ईडीला दिलेल्या जबाबात म्हटलं असल्याचं कळतंय.