वयाच्या 6 व्या वर्षी चिमुकलीनं रचला एव्हरेस्ट सर करत इतिहास, पुढचं मिशन काय?
VIDEO | ध्येय गाठण्याची जिद्द असेल तर कोणतंही शिखर सर करता येते या वाक्याला साजेशी कामगिरी केलीये सहा वर्षीय चिमुकलीने, बघा व्हिडीओ
मुंबई : नवी मुंबईतील साईशा राऊत या सहा वर्षीय चिमुकलीने आपल्या वडिलांसह माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प मिशन पूर्ण केले आहे. विविध संकटावर मात करत साईशाने असाधारण कामगिरी केल्यानं तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. ध्येय गाठण्याची जिद्द असेल तर कोणतंही शिखर सर करता येते या वाक्याला साजेशी कामगिरी केवळ सहा वर्षीय चिमुकलीने करुन दाखवलेय. साईशा मंगेश राऊत हिने आपल्या जिद्द आणि चिकाटीच्या बळावर आपल्या वडिलांसह एव्हरेस्ट बेस कॅम्प सर करण्याचा पराक्रम केलाय. ज्या वयात लहान मूलं विविध खेळ खेळत असतात त्याच वयात साईशाने एव्हरेस्ट चढण्याचा निर्धार केला. यासाठी साईशाने प्रचंड मेहनत घेतली रोज 14 किलोमीटर सायकलिंग 12 किलोमीटर वॉकिंग 1 तास स्विमिंग आणि योगा करत साईशाने स्वतःला खंबीर केले. मायनस 10 ते 20 तापमनामध्ये रोज 10 किलोमीटरची चढाई करुन साईशाने एव्हरेस्टला गवसणी घातली असून तिच्या या कामगिरीबद्दल सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होतोय.