‘गौतमी पाटील यांनी महाराष्ट्राचा बिहार करू नये अन्…’ , ‘या’ पुढाऱ्यानं दिला इशारा

| Updated on: May 19, 2023 | 9:00 AM

VIDEO | 'गौतमीताई तुम्हाला फेमस व्हायचं असेल तर जरूर व्हा, पण...', या पुढाऱ्याचं आवाहन गौतमी पाटील ऐकणार का?

सोलापूर : गौतमी पाटील आणि गर्दी हे समीकरण ठरलेलंय. गौतमी जिथे जाते तिथे गर्दी होतेच होते. गौतमीचा डान्स म्हटला तर टांगा पलटी घोडे फरार अशी प्रेक्षकांची गर्दी असते. बऱ्याचदा गौतमीच्या कार्यक्रमात बसायला जागा नसते म्हणून कुणी झाडावर जाऊन बसतो तर कुणी घराच्या छतावर जाऊन गौतमीच्या दिलखेचक अदा न्याहाळताना दिसतो. गौतमीच्या कार्यक्रमात इतकी गर्दी असते की पोलिसांना जमावावर लाठीमार करावा लागतो.  गौतमीच्या कार्यक्रमात नुसती गर्दी होत नाही तर गर्दीचा धुमाकूळ असतो. पब्लिक अक्षरश: राडा घालते. मात्र गौतमी पाटील हिचा डान्स आणि त्यासाठी होणाऱ्या गर्दीवर महाराष्ट्रातील सर्वांचा लाडका छोटा पुढारी घनश्याम दराडे याने गौतमी पाटीलला चांगलेच सुनावल्याचे पाहायला मिळाले आहे.  “गौतमी पाटील यांनी महाराष्ट्राचा बिहार करू नये. गौतमी पाटलांचा कोणत्याही कार्यक्रम शांततेत पार पडलाय, असं दिसत नाही. लावणी ही लावणी ठेवा. त्याला अश्लीलतेचा रंग देवू नका. तो अश्लीलतेचा प्रकार आम्ही खपवून घेणार नाही. तुम्हाला फेमस व्हायचे असेल तर जरूर व्हा. मात्र ते तुमच्या कर्तुत्वावर. चुकीच्या पद्धतीने अश्लीलता दाखवून फेमस होऊ नका”, असा इशाराच त्याने गौतमीला दिला आहे.

Published on: May 19, 2023 09:00 AM
Special Report : पुस्तक पवार यांचं,निशाणा ठाकरे यांच्यावर, भर बैठकीत फडणवीस यांनी उडवली खिल्ली
परमबीर सिंह भाजपचे एजंट? मविआ कोसळण्यासाठी कोणी केले प्रयत्न? अमोल मिटकरी यांच्या निशाण्यावर कोण?