Garib Rath Express : कसारा स्टेशनजवळ सिग्नलला एक्स्प्रेस थांबली अन् अचानक..; प्रवाशांची उडाली घाबरगुंडी

| Updated on: Sep 23, 2024 | 11:46 AM

तुम्ही कोणत्याही लांब पल्ल्यांच्या प्रवासाला एक्स्प्रेस आणि ट्रेनने प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. जबलपूरहून मुंबईकडे येणारी गरीब रथ रविवारी सकाळच्या सुमारास कसारा रेल्वे स्थानकाच्या आधी एक्सप्रेस उभी असताना झाडावरून चक्क साप थेट एक्सप्रेसमध्ये पडला.

कसारा रेल्वे स्थानकाजवळ एक्सप्रेसमध्ये साप शिरल्यानं प्रवाशांची चांगलीच घाबरगुंडी उडाल्याची घटना समोर आली आहे. जबलपूर मुंबई गरीब रथ एक्सप्रेसमध्ये घडलेल्या या भयावह घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. जबलपूरहून मुंबईकडे येणारी गरीब रथ एक्सप्रेस रविवारी सकाळच्या सुमारास कसारा रेल्वे स्थानकापूर्वी सिग्नलला उभी होती. यावेळी एका झाडावरून चक्क सापाने एक्सप्रेसच्या एसी डब्यात प्रवेश केला. यानंतर हा साप बर्थवर चढून आणखी वर जाण्याचा प्रयत्न करत होता. या सापाला पाहून एक्सप्रेस मधल्या प्रवाशांची मात्र चांगलीच घाबरगुंडी उडाली. काही प्रवाशांनी याचा व्हिडिओ देखील चित्रित केला. या सापाला मोठ्या शर्थीचे प्रयत्न करून बाहेर काढण्यात आल्याची माहिती प्रवाशांनी दिली. यामुळे ट्रेनमधील प्रवाशांची मात्र पाचावर धारण बसली होती. बघा व्हिडीओ

Published on: Sep 23, 2024 11:46 AM
सरन्यायाधीश चंद्रचूड अन् मुख्यमंत्री शिंदे एकाच मंचावर येणार, निमित्त काय? राजकीय वर्तुळात चर्चा
‘एकनाथ खडसे बदनाम गल्लीमधील…’, कोणी केली जिव्हारी लागणारी टीका?