…म्हणून मी अमृता फडणवीस यांना डान्सिंग डॉल म्हटले, विद्या चव्हाण यांचे स्पष्टीकरण

| Updated on: Jan 06, 2022 | 11:48 PM

रश्मी ठाकरेंना राबडी देवींची उपमा दिली हे बरं झालं. फडणवीसांच्या पत्नीची उपमा दिली असती तर डान्सिंग डॉल अशी प्रतिमा झाली असती, असं विधान विद्या चव्हाण यांनी केलं होतं, विद्या चव्हाण यांच्या या वक्तव्यावरून आता नवा वाद निर्माण झाला आहे.

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यावर वादग्रस्त टिप्पणी करणाऱ्या जितेन गजारिया याला अटक करण्यात आली आहे. त्याने केलेल्या टिप्पणीवर राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी तीव्र शब्दात निषेध नोंदवला. मात्र, हा निषेध नोंदवताना त्यांनी त्यात अमृता फडणवीस यांनाही ओढलं आहे. रश्मी ठाकरेंना राबडी देवींची उपमा दिली हे बरं झालं. फडणवीसांच्या पत्नीची उपमा दिली असती तर डान्सिंग डॉल अशी प्रतिमा झाली असती, असं विधान विद्या चव्हाण यांनी केलं आहे. दरम्यान या वक्तव्यावरून राजकारण तापल्याचे पहायला मिळत आहे. या वक्तव्यावरून वाद निर्माण झाल्यानंतर चव्हाण यांनी स्पष्टीकरण दिले आहे. अमृता फडणवीस या चांगल्या डान्स करतात म्हणून त्यांना आपण डान्सिंग डॉल असे  म्हटले, असं विद्या चव्हाण या म्हणाल्या आहेत.

Special Report| कोरोनाचा धोका वाढला, रेल्वे, मॉल आणि रेस्टॉरंट यांचं नेमकं काय होणार?
भिवंडी तालुक्यातील सॉक्सो कंपनीला भीषण आग