Chhagan Bhujbal यांच्याविरोधात अंजली दमानिया यांची कोर्टात धाव, काय आहे प्रकरण?

| Updated on: Oct 09, 2023 | 12:06 PM

VIDEO | घोटाळ्यांच्या आरोपांवरुन सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी भाजपला धारेवर धरलं आहे. अजित पवारांचा गट सत्तेत सामील झाला असला तरी त्यांच्यामागच्या आरोपांचा सिलसिला सुरूच, अंजली दमानिया यांची कोर्टात धाव अन् गैरव्यवहाराच्या आरोपांवरुन दमानियांनी भाजपलाही सवाल

मुंबई, 9 ऑक्टोबर 2023 | घोटाळ्यांच्या आरोपांवरुन सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी पुन्हा एकदा भाजपला सवाल केले आहेत. विशेष म्हणजे एका प्रकरणात त्या कोर्टात सुद्धा जाणार आहेत. अजित पवारांचा गट सत्तेत सामील झाला असला तरी त्यांच्यामागच्या आरोपांचा सिलसिला थांबलेला नाहीय. भाजपनंच केलेल्या आरोपांवर काही भाजपच्या नेत्यांचे मौन आहेत, मात्र आरोपांविरोधात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया कोर्टात गेल्या आहेत. कथित घोटाळ्याबद्दल खुद्द फडणीसांनीच सभागृहात फैरचौकशीचं आश्वासन दिलं होतं. त्यावर कारवाई का झाली नाही, असा प्रश्न दमानियांनी सरकारला केला आहे. गैरव्यवहाराच्या आरोपांवरुन दमानियांनी भाजपलाही सवाल केले आहेत. खासकरुन ज्या सिंचन घोटाळ्याविरोधात बैलगाडीभर पुरावे असल्याचं म्हटलं होतं, त्या भाजपनं अजित पवारांनाच सत्तेत कसं घेतलं, असा प्रश्न त्यांनी केलाय. नेमकं काय म्हटलं बघा स्पेशल रिपोर्ट

Published on: Oct 09, 2023 12:06 PM
टोलधाड कधी बंद? मुंबईतील टोल दरवाढीविरोधात मनसे अन् राज ठाकरे आक्रमक
Saamana | …अन् देवेंद्र फडणवीस यांची लायकी काढली हे बरे नाही, सामनातून केंद्रातील नेतृत्वावरच हल्लाबोल